महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम:तालुक्यातील शेतकरी व शेतकरी पुत्राने एकत्र येऊन दिनांक ११ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर गोलाई चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या रास्त मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने मागण्या शास- नाने कांदा निर्यात बंदी हटविण्यात यावी, दूध उत्पादक घेणाऱ्या पशु मालकांच्या दुधाला दरवाढ देणे, भूम तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणे, उर्वरित ७५ टक्के विम्याचे वितरण करणे या मागण्यासाठी शेतकरी व शेतकरी पुत्रांच्या वतीने हे. रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.’शेतकरी पुत्रांचा’ शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको किंवा निर्यातबंदी उठवावी. दुध उत्पादकांना ५ रुपये अनुदान शेवटच्या घटका पर्यंत देणार नाहीत त्यापेक्षा भाव वाढवून द्यावा. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे दुध डेअरी मालकांनी बटर आणि भुकटी बनवायला सांगितली त्याचं उत्तरदायित्व घेऊन दरवाढ करून दुधाला अनुदान नाही पाहिजे असे बोलताना शेतकरी पुत्रांनी सांगितले. विमा कंपनीने अग्रीम दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नसून उर्वरित विमा शेतकऱ्यांना द्यावाच लागेल, शेतकऱ्यांवर कांदा निर्यातबंदी लादली असून बंदी उठवावी नाही तर उत्पादन खर्च अभ्यासून आजघडीला कांदा १५ रू किलोने विकत असून त्याच धर्तीवर १५ रुपये किलोमागे अनुदान द्यावं यावेळी अनिल शेंडगे, सतीश कदम, अनुप सूळ, संदिपान कोकाटे, विलास पवार, फैझान काझी आदी पुत्र व होते.
