सहा महिलांसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
वैराग : वैराग नगरपंचायतीच्या दोन्ही दरवाजांना आंदोलनकर्त्यांनी टाळे ठोकले. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नगरपंचायतीच्या दोन्ही दरवाजांना टाळे ठोकले.
दरम्यान शासकीय कामांमध्ये अडथळा आणून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याबद्दल १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहा महिलांचादेखील समावेश आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी वैराग ग्रामपंचायतचे रूपांतर वैराग नगरपंचायतीमध्ये झाले. त्यानंतर वैराग नगरपंचायतीने सादर केलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीनुसार पुणे विभागीय आयुक्तांनी ६२ कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचाऱ्यांना प्रमाणित केले. तर १३ कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवले होते. शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांना प्रमाणित करण्यात आले नसल्याचे उपोषणकर्ते संपत धेंडे यांनी म्हटले आहे. गेल्या दहा दिवसांपासून धेंडे यांनी वैराग नगरपंचायतीसमोर आपले आमरण उपोषण केले होते. कायम सेवेतून सात कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले असून ही प्रक्रिया पार पाडणारे तत्कालीन सर्व अधिकारी यास कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान या संदर्भात उचित निर्णय घेण्यात येत नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी नगरपंचायतीला टाळा ठोकण्याचा इशारा दिला होता त्यानुसार .दरम्यान शासकीय कामांमध्ये अडथळा आणून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याबद्दल १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यामध्ये सहा महिलांचा देखील समावेश आहे. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेकरीता प्रगणक म्हणून नेमणूक झालेले कर्मचारी आत मध्ये अडकले यात सुदाम खेंदाड, सचिन पानबुडे,प्रशांत वाघमारे, रामभाऊ जाधव, सलीम पठाण रफिक शेख या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी कार्यालयीन अधीक्षक मनीषा कदम यांनी नगरपंचायती कुलूप लावून कर्मचाऱ्यांना कोंडत सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा दाखल केला आहे. आंदोलन करते संपत दगडू धेंडे यांनी बेकादेशीर जमाव जमवून जमावातील बाळासाहेब पांढरमिसे,स्वप्निल चौधरी, दत्तात्रय घोडके, लखन खांडेकर, शंकर ढेकळे, सुशील बिर्गे, विक्रम दहीटणकर यांच्यासह सहा महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.