महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल मध्ये ८ फेब्रुवारी रोजी १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर होते.
अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.ज्या शाळेने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवले, संस्कार दिले ती शाळा सोडून जायची या विचारानेच विद्यार्थी भावूक झाले होते. यावेळी उपमुख्याध्यापक रा.द. इंगळे, मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चंद्रकांत नवले व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रसन्न देशपांडे यांनी केले. उपस्थित सर्व १० वी च्या तुकडीचे वर्गशिक्षक रोहित आगरकर, किरण लांडे, रमेश स्वामी, चंद्रकांत नवले, पर्यावेक्षक प्रसन्न देशपांडे, रामकृष्ण इंगळे, पर्यावेक्षीका सौ उर्मिला जावळे, संतोष तोडकरी, सहसचिव धनाजी राऊत यांनी पुढील उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.