महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : येथील प्राईड इंग्लिश स्कूलचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन धनेश्वरी शिक्षण समूहाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी शाळेचे संचालक ऍड. सिराज मोगल, अमर सुपेकर, फैजान काझी व प्राचार्या कल्याणी असलकर हे उपस्थितीत होते. यावेळी मान्यवराच्या हस्ते वर्षभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. प्रतापसिंह पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. प्राईडच्या बालकलाकारानी केलेल्या अदाकारीचे कौतुक करत यातील कलाकार आगामी काळात टिव्हीवर झळकतील.
यावेळी विद्यार्थानी हिंदी, मराठी चित्रपट व लोकगीतावर बहारदार नृत्य सादर केली. शेतकरी गीत, फनी डान्स, गरबा,भांगडा यावर बहारदार नृत्य सादर करुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
या विदयार्थ्यांना इम्रान शेख यांनी नृत्याचे धडे दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलीम सर यांनी केले तर आभार फैजान काझी यांनी मानले तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका मेघा सुपेकर, सरस्वती कुलकर्णी, दिपीका टकले, चैताली टकले यांच्यासह आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे यांच्यासह गणेश सुपेकर, अतुल पुणेकर, विश्वजीत सुपेकर, दिगंबर पुणेकर यांनी परिश्रम घेतले.

 
			


















