सर्वपक्षीय नेते आक्रमक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते भुम नगरपालिकेतनिवेदन देण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी मुख्याधिकारी हजर नव्हते.
त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीयांनी त्यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मुख्याधिकारी जवळपास अर्ध्या तासाने नगर परिषदेमध्ये आले असता त्यांना निवेदन देण्यात आले त्यात गेल्या अनेक महिन्यापासून गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांचा उद्रेक वाढलेला आहे.
लहान लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. एका आठवड्यात तीन मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतलेला असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी निवेदने देऊनही प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही.
त्यामुळे येत्या आठ दिवसात शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर शहरात फिरणारी मोकाट कुत्रे पकडून ते नगरपालिकेमध्ये सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल तसेच लहान मुलांना कुत्रे चावल्यास व काही गंभीर घटना घडल्यास त्यात सर्वस्वी नगरपरिषद प्रशासन जबाबदार धरले जाईल असे निवेदन सर्व पक्षीयाकडून देण्यात आले.
या निवेदनावर आबासाहेब मस्कर संतोष सुपेकर, चंद्रमनी गायकवाड, रुपेश शेंडगे, शंकर खामकर हेमंत देशमुख, सचिन बारगजे, प्रदीप साठे आदी पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

 
			


















