“अक्षरांची रांग” या लेख संग्रहासाठी : रामचंद्र इकारे यांना साहित्य सेवा पुरस्कार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : साहित्यिकांनी लिहिण्यासोबतच वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे असे मत प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.
ॲग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनमध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी संमेलनाचे उदघाटक परमपूज्य तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या हस्ते व प्रा नितीन बानगुडे पाटील, ज्येष्ठ लेखक जगन्नाथ शिंदे ,संमेलनाचे अध्यक्ष युवा कवी अविनाश चव्हाण, ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सस्ते, संयोजक प्रा. विजय काकडे आदींच्या उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यकृतींना सन्मानित करण्यात आले.
त्यामध्ये रामचंद्र इकारे यांना त्यांच्या ‘अक्षरांची रांग’ या लेख संग्रहासाठी ‘साहित्य सेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गार्डे, सुलभा सस्ते यांनी केले.
रामचंद्र इकारे यांच्या ‘माणुसकीचं आभाळ’ या काव्यसंग्रहाला याआधी गावगाडा पुरस्कार तर ‘अक्षरांची रांग ‘ या लेखसंग्रहाला माणगंगा साहित्यप्रेमी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

 
			


















