अनेकांनी जिंकली भरगच्च बक्षीसे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : राज्याचे आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालक मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत भूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमास महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम ज्योती धनंजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला. महिलांना रोजच्या धावपळीच्या जीवनातून तणावमुक्त करण्यासाठी विरंगुळा म्हणून घेण्यात आला.
‘न्यू होम मिनिस्टर”खेळ पैठणीचा’ या मनोरंजनात्मक कार्यक्रम व खेळासोबतच प्रश्न मंजुषा व उखाण्यांच्या माध्यमातून लकी ड्रॅ पद्धतीने स्कूटी सह लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली होती. या कार्यक्रमास महिला वगनि मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला.महिलांना दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून मनोरंजनाकडे घेऊन जाण्यासाठी खास महिलांसाठी सिनेतारका सोनाली पाटील, सिनेतारका अक्षता सावंत व सिनेतारका मधुरा कुंभार यांच्या प्रमुख आकर्षणासोबत अभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे या स्पर्धे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये उखाणे, जुन्या पिढीतील महिलांचे बऱ्याच वेळ चालणारे उखाणे तर आधुनिक पद्धतीचे वैचारिक व संस्कृतीचे दर्शन घडवणारे उखाणे स्पर्धा चांगलीच रंगली होती. यावेळी विशेष म्हणजे तळ्यात मळ्यात हा खेळा सोबत फुगे फुगवून फोडण्याचा खेळ तर खूप रंगल्याने महिला भगिनींनी मनसोक्त आनंद लुटला. यावेळी मराठी, हिंदी गाणी, नृत्य, मनोरंजन खेळ, विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तनुजा शुभम बागडे यांना स्कुटी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
व्दितिय पारितोषिक रोहिणी प्रकाश मोरे यांना डबल डोअरचे फ्रिज, व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक स्मार्ट टी व्ही प्रतीक्षा कुंदन कांबळे यांना मिळाला तर सोनाली शुभम वाघमारे यांना चौथे बक्षिस वॉशिंग मशिन यांसह शेकडो पैठण्या, व मिक्सर मिळाले. धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, भूमचे नगराध्यक्ष संजय गाढवे, यांच्यासह ज्योती धनंजय सावंत, नियोजन समिती सदस्या संयोगिता गाढवे यांच्या सोबत सिनेतारका सोनाली पाटील, सिनेतारका अक्षता सावंत व सिनेतारका मधुरा कुंभार यांच्या हस्ते विजेत्या महिलांना विविध बक्षिसे देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सादरीकरण या भागात सूत्र संचलना सर्वश्रुत असणारे आलीम शेख सर यांनी केले. धनंजय सावंत यांच्या सुविद्य पत्नी ज्योती सावंत यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष संयोगिता गाढवे, शिवसेना महिला आघाडीच्या अर्चना दराडे यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी त्यांचे आभार मानले.
