80 हजार रूपये किंमतीची 1600 लिटर हातभट्टी दारू 40 रबरी टयुबासह नष्ट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मौजे मुळेगाव तांडा येथे चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या 2 आरोपींवर कारवाई केली.
यावेळी 80 हजार रूपये किंमतीची 1600 लिटर हातभट्टी दारू 40 रबरी टयुबसह नष्ट करण्यात आली. विकास पवार (मुळेगाव तांडा) आणि बासू राठोड (मुळेगाव तांडा) यांना अटक करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुक 2024 ची प्रक्रिया शांततेत पार पाडून पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या करीता चोरून अवैधरित्या गावंठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आरोपींवर ऑपरेशन परिवर्तनच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली.
मौजे मुळेगाव तांडा सोलापुर शिवारात पेट्रोलिंग करीत असताना मुळेगाव तांडयाच्या पश्चिम बाजुस असलेल्या चिल्लारच्या झाडा झुडपाच्या आडोशाला 2 व्यक्ती, चोरून गावंठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या साहित्यासह बाळगुन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तेथे छापा टाकुन कारवाई केली आहे. या छापा कारवाईत 80 रूपये किंमतीचे 1600 हजार लिटर गावंठी हातभट्टी दारू तयार करण्याकरीता लागणाऱ्या साहित्यासह गावंठी हातभट्टी 40 रबरी ट्युब जागीच फोडुन गावंठी हातभट्टी दारू जागेवरच नष्ट केली आहे.
यापुढेही अशा प्रकारे चोरून अवैधरित्या गावठी दारूच्या हातभट्टयाच्या ठिकाणी छापा कारवाई करून त्या उदध्वस्त करून आरोपींविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग संकेत देवळेकर यांनी दिले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे नामदेव शिंदे, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील नेमणुकीस असलेले सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील इंज्जपवार, पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक अनंत चमके, लालसिंग राठोड, आसिफ शेख, पोलीस अंमलदार ननवरे व पोलीस मुख्यालयाकडील आर.सी.पी पथकातील पोलीस अंमलदार यांनी बजाविली आहे.
