दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुपच्या वतीने आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुपच्या वतीने हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ 10 मार्च 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पुष्प मंगल कार्यालय बिबेवाडी येथे करण्यात आलेले आहे.
हे रक्तदान शिबिराचे पाचवे वर्ष आहे. या वर्षी एक हजार बाटल्या रक्त संकलित करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे.
गौतम निधी, डिवाइन जैन ग्रुप, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप, आनंद दर्शन युवा मंच, आनंद दरबार, फर्स्ट विजन प्री स्कूल, आरंभ यात्रा संघ, राजश्री शाहू बँक, सह्याद्री पतसंस्था, फ्रेंड्स क्लब फॉर एव्हर, सहाय्यता ग्रुप, गुड टाईम ग्रुप, ISO CIL क्लब, दी सोशल युथ क्लब, FTN फाउंडेशन, आर जे हेल्पिंग हँड्स अशा अनेक संस्था या शिबिरामध्ये सहभागी आहेत.
डॉ. विजय सेटीया यांचे या शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले असून सुमारे 6 ब्लड बँक या शिबिरामध्ये रक्त संकलित करतील अशी माहिती ऍड. रविंद्र दुगड यांनी महाराष्ट्र जैन वार्ताशी बोलताना दिली. उन्हाळ्यामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा असतो.
त्यामुळे या रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन, आपल्या पुणे शहरातील रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी रक्तदान करावे असे आव्हान दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
