डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी तर्फे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
पिंपरी चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी, पुणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन ” दृष्टी २०२४ ” चे रंगतदार आयोजन करण्यात आले होते.
या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या सप्ताहात मेहंदी, नेलआर्ट, सॅलड सजावट, फुलांची सजावट, प्रश्नमंजुषा, डार्क रुम, कॅनव्हास पेंटिंग, ट्रेझर हंट व कॅन्डी कार्निव्हल अश्या विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी भाग घेतला.
संस्थेचे संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी डॉ. एन. एस. व्यवहारे, प्राचार्य प्रा. मुकेश मोहिते, समन्वयक सांस्कृतिक उपक्रम आणि डॉ. वैभव वैद्य, समन्वयक क्रीडा यांच्या हस्ते झाले. डॉ. व्यवहारे यांनी आपल्या भाषणात, शैक्षणिक उपक्रमांसह सर्वांगीण विकासाच्या महत्त्व खूप अजे असे सांगीतले.
एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांनी डॉ. व्यवहारे यांचे अप्रतिम तयार केलेले पेन्सिल स्केच पोर्ट्रेट सादर केले, जे त्यांच्या कृतज्ञतेचे आणि कौतुकाचे प्रतिबिंब होते. भरत नाट्यम नृत्याने गणेशाचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक उपक्रमातून त्यांच्यातील सुप्त कलागुण दिसून आले.
संपूर्ण कार्यक्रमात, विद्यार्थ्यांनी स्कीट्स, संगीत सादरीकरण आणि विविध नृत्य प्रकारांसह अनेक सादरीकरणासह प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. उत्सवात सामील झालेल्या प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग लक्षणीय होता.
या विविध प्रकारच्या स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रम आयोजनासाठी डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. मुकेश मोहिते, समन्वयक सांस्कृतिक उपक्रम तसेच क्रीडा प्रभारी डॉ. वैभव वैद्य, प्रा. पल्लवी सोमठाणे, प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी कर्तव्यशील भावनेतून परिश्रम घेतले त्याबद्दल प्राचार्यांनी त्यांचे कौतुक करत अशा प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित केले.
