महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : अयोध्येतील प्रभू श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भूम तालुक्यातून तब्बल 120 रामभक्त रवाना झाले आहेत.
हे सर्वजन भूम शहरातून प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत मार्गस्थ झाले. प्रभू श्रीरामलल्लाचे दर्शन घडवून आणण्याची संधी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य पाटील, परंडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
भूम शहरातील 30 रामभक्त व भूम तालुका ग्रामीण भागातील 90 रामभक्त मोठ्या आनंदी वातावरणात भूम शहरातील यश मंगल कार्यालयापासून गोलाई चौकापर्यंत प्रभू श्रीरामाचा जयजयकार करत चालत येऊन खाजगी वाहनाद्वारे धाराशिव येथून उपलब्ध केलेल्या आस्था रेल्वेच्या माध्यमातून अयोध्येकडे रवाना झाले आहेत.
या सर्वांना तालुका पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर, शरद चोरमले यांच्यासह असंख्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
रामभक्तांना दर्शन घडवून आणण्यासाठी प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, शांतीराज बोराडे, शुभम खामकर, ओम खामकर आदींनी जबाबदारी घेतली आहे.
भूम परांडा वाशी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते प्रभू श्रीरामाचा जयजयकार करत आयोध्येकडे रवाना झाले. यावेळी रामभक्तांनी काढलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. रामभक्त धाराशिव येथून आस्था रेल्वेच्या माध्यमातून विशेष रेल्वेने अयोध्येला जाणार आहेत.
