तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात रविंद्र हायस्कूलने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत पुन्हा एकदा यशाचा झेंडा रोवला.
या अभियानात तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर असे मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनात ही शाळा तालुकास्तर व जिल्हास्तर मिळून पाच लाख रुपये रकमेच्या बक्षिसाची मानकरी ठरली आहे.
हे यश सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्या अथक परिश्रमातून मिळाले असून या यशाचे जिल्ह्यात सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. या यशानिमित्त रवींद्र हायस्कूल भूम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यात मुख्याध्यापिका शर्मिला सूळ याचा व शिक्षक तसेच विद्यार्थी यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना शार्मीलापाटील यांनी शाळेला सुंदर बनवण्यात योगदान असणाऱ्या सर्वांचे आभार मांडले. व तसेच कशा प्रकारे कमी कालावधीत शाळेला पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न केले हे सविस्तर मांडले.
या कार्यक्रमासाठी गट शिक्षण अधिकारी राहुल भट्टी, शिक्षण महर्षी आर. डी. सूळ, मुख्याध्यापिका शर्मिला सूळ, धनंजय पवार, अमर सुपेकर, मिलिंद लगाडे, अनुप सूळ, शार्मीला पाटील, कुंभार सर उपस्थित होते.