2 लाख 32 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : चोरून अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्याविरूध्द छापा कारवाई करण्यात आली. ही कामगिरी सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याने केली.
राजु पवार (रा.मुळेगाव तांडा ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर), मनोज पवार (रा.मुळेगाव तांडा ता.दक्षिण सोलापूर) गोविंद राठोड (रा.मुळेगाव तांडा ता.दक्षिण सोलापूर) शिवाजी राठोड (रा.मुळेगाव तांडा ता.द.सोलापूर) विशाल चव्हाण (रा.वरळेगाव तांडा ता.द.सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
यावेळी 1 लाख 92 हजार 150 रूपये किंमतीची 3700 लिटर हातभट्टी दारू, 40 हजार रूपये किंमतीची दुचाकी मोटार सायकल असा एकूण 2 लाख 32 हजार 150 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुक 2024 ची प्रक्रिया शांततेत पार पाडुन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे 3 दिवस चोरून अवैधरित्या हातभट्टी दारू बाळगणा-या व्यक्तींविरूध्द कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते.
त्यांना माहिती मिळाली की, मौजे मुळेगांव तांडा ता.द.सोलापूर येथील सालकी वेअर हाऊसच्या पुर्व बाजुस चिल्लारीच्या तसेच मुळेगाव तांडयाच्या दक्षिण बाजुस असलेल्या चिल्लारीच्या झाडाझुडपाच्या आडोशाला व मौजे वरळे गाव तांडयाच्या पुर्व बाजुस असलेल्या शेत बांधाजवळ चोरून अवैधरित्या हातभट्टी दारूच्या रबरी टयुबा, प्लॅस्टीक घागरी, बॅरेल तसेच हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य काही व्यक्ती बाळगुन आहेत.
त्यानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे 3 ठिकाणी छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे. तसेच 6 मार्च रोजी मुळेगाव ता. द. सोलापूर येथील हनुमान मंदीराच्या समोरील रोडवर दोड्डी गावाकडुन येणा-या रोड वरून एक व्यक्ती त्याच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची दुचाकी मोटार सायकली वरून 6 काळया रंगाच्या रबरी टयुबा त्यामध्ये 12 हजार रूपये किंमतीची 240 लिटर हातभट्टी दारू बेकायदेशीररित्या वाहतुक करीत असताना मिळुन आला आहे त्याच्याकडुन 240 लिटर हातभट्टी दारू व दुचाकी वाहनासह एकूण 52 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
केलेल्या कारवाईत एकूण 4 व्यक्तींविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरून अवैधरित्या हातभट्टी दारू बाळगणा-या व्यक्तींची माहिती काढुन त्यांच्याविरूध्द कारवाई करण्याचे व यापुढेही कामकाज चालु असणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर संकेत देवळेकर यांनी सांगितले आहे.
ही छापा कारवाई पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे.