महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
पिंपरी चिंचवड : आकुर्डी स्थित डॉ. डी वाय पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी शिवराज जाधव आणि भावना चौधरी हे राष्ट्रीय स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते ठरले आहे.
किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर तसेच राष्ट्रीय फार्मसी शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पस्तीस हजार रुपये रोख, चषक, प्रमाणपत्र आणि ऍपिटोरिया फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद येथे प्रशिक्षण असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून २४ राज्यातून ६५७ संघांनी ऑनलाइन भाग घेतला होता.
त्यामधून २१ संघांना नागपूर येथे उपांत्य फेरीसाठी बोलवण्यात आले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान शिवराज जाधव आणि भावना चौधरी यांनी वर्चस्व दाखवत ही स्पर्धा जिंकली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या आमच्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे असे प्राचार्या डॉ. नीरज व्यवहारे यांनी सांगीतले.
प्रा. कल्याणी सहारे आणि प्रा. पवनकुमार वानखडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
