8 तारखेला भूम शहरात जाहीर सभेचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : तानाजी सावंत यांच्या बालेकिल्लात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. भूम परंडा व वाशी मतदारसंघात ते 8 तारखेला सभेसाठी दाखल होणार आहेत. सभेचे ठिकाण नगरपरिषद कार्यालय भूम नागोबा चौक याठिकाणी ठेवण्यात आलेले आहे.
नामदार तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघातच ही सभा होत असल्यामुळे यात उद्धव ठाकरे, संजय राऊत काय टीका करतात याकडे अख्या तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर भूम शहरात जंगी तयारी सुरू आहे.पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे मोठे बॅनर भूम शहरात लावण्यात आलेले आहेत. तसेच होणाऱ्या सभेच्या संदर्भात शिवसेना पदाधिकारी यांच्या बैठका सुरू आहेत.
लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर होणारी सभा लोकसभेचे धाराशिव जिल्ह्याचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचाराची ही सुरुवात तर नाही ना अशी चर्चा आता भूम तालुक्यात सुरू झाली आहे. तसेच या सभेच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याची संधी ओमराजेंना मिळणार आहे.
या सभेला नागरिक किती गर्दी करतात. त्यातच माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आजारातून बरे होऊन मतदारसंघात सर्वत्र फिरत असल्यामुळे या सभेला उत्तुंग गर्दी होणार असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांचे पुत्र रणजीत पाटील हे जिल्हाप्रमुख असल्याने या सभेची सर्व जबाबदारी त्यांनी घेतलेली असून सर्व शिवसैनिकांची मुठ बांधण्याचे लक्ष त्यांच्यापुढे असणार आहेत.
भूम तालुक्यातील पदाधिकारी शिवसेना जिल्हा महिला प्रमुख जीनत सय्यद, शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिलीपराव शाळु, युवा सेना जिल्हाप्रमुख चेतन बोराडे, तालुकाप्रमुख जाधवर, युवा जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद आडागळे, माजी शहर प्रमुख दीपक मुळे, रामभाऊ नाईकवाडी, माजी तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, ऍड. विनोद नाईकवाडी, भूम शहर प्रमुख प्रकाश आकरे, विहंग कदम व असंख्य शिवसैनिक या सभेच्या तयारीला लागले आहेत. ही सभा वादळी ठरणार असे सध्यातरी भूम तालुक्यात चित्र आहे.
