खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : माथाडीच्या नावाखाली क्रियेटीसिटी मॉल येरवडा येथील वुडन स्ट्रीट फर्निचर कंपनीच्या प्रतिनिधींकडे खंडणी वसुली करून बेकायदेशीर पैशाची मागणी करणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई करण्यात आली आहे. ही कामगिरी खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखेने केली आहे.
या प्रकरणी शेखर लोंढे (वय ३७ वर्षे, रा. नागपुर चाळ, जुना जकात नाक्याच्या पाठीमागे, नागपुरचाळ पोलीस चौकी समोर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. वुडन स्ट्रीट फर्निचर प्रा. लि. क्रियेटीसिटी मॉल, येरवडा या कंपनीचे तक्रारदार यांना शेखर लोंढे हा माथाडीच्या नावाखाली वेअर हाऊस वरुन फर्निचर मटेरीयल घेत असे.
तसेच आलेल्या ट्रक मधील फर्निचर फिर्यादी यांच्या कामगारांना खाली करु न देता आडवणूक करुन, आम्ही येथील स्थानिक आहोत असे सांगत असे व फिर्यादी यांच्याकडून प्रति महिना १८ हजार रुपये घेऊन कंपनीचे हाऊसकिपींग तसेच लेबरचे कॅन्ट्रक्ट स्वतः ला देण्याकरीता जीवे ठार मारण्याची धमकी देत असे.
ही माहिती तक्रार खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखेला झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपी शेखर लोंढे याच्याकडे नमूद कंपनीची माथाडी संदर्भात कोणतीही वर्क ऑर्डर नव्हती.
तसेच तो माथाडी बोर्ड या ठिकाणी नोंदीत कामगार नसताना माथाडीच्या नावाखाली तक्रारदार यांना धमकावत असल्याचे व यापुर्वी देखील आरोपीने तक्रारदार यांच्याकडून धमकी देऊन १२ हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार आरोपी शेखर लोंढे याच्याविरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शेखर लोंढे हा सध्या पोलीस कस्टडीत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-२ सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार विजय गुरव, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, चेतन चव्हाण, चेतन शिरोळकर यांनी केलेली आहे.
