विमानतळ पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : फिनिक्स मॉल मध्ये ग्राहकांच्या पर्स मधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी विमानतळ पोलिसांनी केली आहे.
दिपक पपाले (वय ३५ वर्ष रा. स.नं. १२, बनसोडे चौक, लक्ष्मीनगर येरवडा) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडुन सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. फिनिक्स मॉल येथील मिस्टर डी. आय. वाय. विमाननगर येथे फिर्यादी हे खरेदीसाठी गेल्यावर त्यांच्या सासुची सोन्याचे दागिने असलेली पर्स ही शॉपमध्ये पर्स ठेवण्यासाठी असलेल्या जागेमध्ये ठेवली होती.
तेव्हा चोरट्याने मॉल मधील शॉप मध्ये प्रवेश करुन फिर्यादी यांच्या पर्स मधील ३,५५,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. याबाबत विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तात्काळ घटना स्थळाला भेट देऊन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना तपासाबाबत सुचना दिल्या. त्यानुसार आरोपीचा शोध घेत असताना अविनाश शेवाळे व नाना कर्चे यांना माहिती मिळाली की, मिस्टर डी. आय. वाय. विमाननगर या शॉपमध्ये चोरी करणारा व्यक्ती दिपक पपाले असुन तो येरवडा परीसरात राहत आहे. तो सराईत चोर आहे.
त्याप्रमाणे आरोपी याची माहिती घेऊन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी विजय चंदन व तपास पथकातील स्टाफ यांनी संजय पार्क येथे एअर पोर्ट रोडच्या शेजारील मोकळ्या जागेमधुन त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी याने गुन्हा केल्याचे कबुल केले.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन हे करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस अंमलदार राकेश चांदेकर, शैलेश नाईक, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, गिरीश नाणेकर, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, गणेश इथापे, ज्ञानदेव आवारी यांनी केलेली आहे.
