महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळा ची वार्षिक सर्वसाधारण सामान्य सभा महामंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पारेख यांच्या अध्यक्षेतेमध्ये आयोजीत करण्यात आली होती. या सामान्य सभेमध्ये पुढील सन २०२४ – २०२८ या चार वर्षासाठी महामंडळाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष हेमराज शहा (मुंबई), अध्यक्ष पदी जयप्रकाश पारेख (नागपूर) तर पुण्याचे राजेश शहा यांची महामंत्री पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात अली. तसेच उपाध्यक्ष पदी मुकेश मेहता (सोलापूर), सेक्रेटरी ऍड. संजीव वाणी (धुळे) आणि खजीनदार लखमशीभाई शहा (मुंबई) या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सदर कार्यकारिणीमध्ये २५ कार्यकारिणी सदस्य, ५ कॉब कार्यकारिणी सदस्य, व १० निमंत्रित सदस्य अशा एकूण ४० सदस्यांचा समावेश आहे. सदरची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया श्री पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू यांच्या देखरेखीत पार पडली. राज्यातील गुजराती समाजाच्या हिताच्या दृष्टीने पुढील काळात महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम, समाजाचे एकीकरण, शैक्षणिक समस्या इत्यादी बाबत पुढील काळातील नियोजन यांवर चर्चा करण्यात अली. तसेच गुजराती समाज परिचय संमेलने घेणे, लहान व गृहोपयोगी व्यवसायांवर चर्चा करणे अशा बऱ्याच विषयांवर सदर सभेत चर्चा करून योजनाबद्ध कार्यक्रम आखण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती महामंडळाचे नवनियुक्त महामंत्री राजेश शहा यांनी दिली.
