महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या अंतर्गत वूमन एम्पॉवरमेंटच्या वतीने महीला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्राचार्या दिपाली छाजेड, उद्योजिका प्रियांका परमार, रिटायर्ड प्राचार्या अश्विनी जोशी, खेळाडू डॉ. सुवर्णा देवळणकर आणि कलाकार भाग्यश्री चौंधे अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी लायन भारती भंडारी, लायन राणी अह्लूवालिया, प्रांतपाल लायन विजय भंडारी, माजी प्रांतपाल लायन अभय शास्त्री आणि कॅबिनेट सचिव लायन अशोक मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
