महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : गोसेवा हीच ईश्वरसेवा मानून वर्धमानायतन चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. गुरुमाँ डॉ. मंजुश्री गोशाळा ही अत्याधुनिक सर्वसुविधांनी युक्त असून राज्यातील इतर गोशाळांसाठी दिशादर्शक ठरेल असे गौरवोद्गार जैन सोशल ग्रुप गोग्रासचे सौरभ शहा यांनी काढले.
वर्धमानायतन चॅरिटी ट्रस्टच्या वतीने गुरुमाँ डॉ. मंजुश्री गोशाळेचे उद्घाटन जैन समाजातील समाजरत्नांच्या मातांच्या हस्ते अभिनव पध्दतीने करण्यात आले, यावेळी सौरभ शहा बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमणलाल लुंकड होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून विजयकांत कोठारी, सुभाष लोढा उपस्थित होते.
गोशाळेचे उद्घाटन अनुराधा कांतीलाल संचेती, शांताबाई मदनलाल छाजेड, प्रमिला नौपतलाल सांकला, आनंदी रतनचंद धोका, विमल बाबुलाल भंडारी, निर्मला अनुपचंद संचेती आणि नवलाखा परिवाराच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक राजेश सांकला, विजय भंडारी, रविंद्र सांकला, मनोज छाजेड, लखिचंद खिंवसरा, राजकुमार चोरडिया, पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र बाठीया, हेमंत भंडारी, भारत देसरडा, प्रविण परदेशी, ललीत गुंदेचा, बाळासाहेब धोका आदी उपस्थित होते.
या प्रसंगी विजय भंडारी म्हणाले, जयति जैनम साधना तिर्थ ट्रस्ट आणि गोशाळेचा परिसर लवकरच धार्मिक क्षेत्र म्हणून उदयास येईल़. राजेश सांकला म्हणाले की, जैन समाज हा दान देणारा समाज म्हणून ओळखला जातो़.
आम्ही गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी कायमच वचनबध्द आहोत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश संचेती, सुनील शहा, महावीर नहार, सुनील लुणावत, राजेंद्र मुनोत, पवन भंडारी, महावीर चोरडिया, जीवन बेद, वैभव सेटीया, संतोष भुरट, शीतल भंडारी, सौरभ धोका, वैभव लोढा, अशोक लोढा, नितीन चोपडा, महेंद्र सुंदेचा यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रास्ताविक अध्यक्ष ललीत जैन यांनी केले. सुत्रसंचालन स्नेहल चोरडिया यांनी केले.
घरातील व्यक्तींसारखी गौमातेची काळजी
आम्हाला गुरु माँ डॉ, मंजुश्री म.सा. यांच्या प्रेरणेने गोशाळेच्या उभारणीची प्रेरणा मिळाली आहे. गायींसाठी केवळ गोठा न बनविता घरासारखीच गोशाळा बनविली आहे. या गोशाळेत घरातील व्यक्तींना जसे जपले जाते त्याच पद्धतीने गौमातेचा सांभाळ केला जात आहे. उन्हाळ्यात गायींसाठी पंख्याबरोबरच वॉटर स्प्रिंकलरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या गायी दूध देत नाही या गोवंशांचा सांभाळ करणे हाच आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. – ललीत जैन ,अध्यक्ष वर्धमानायतन चॅरिटी ट्रस्ट मंडळ
















