खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगारास जेरबंद करण्यात खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेला यश आले आहे.
सुरज खंडागळे, (वय ३० वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, २०६ एच बिल्डींग वारजे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. पोलीस अंमलदार विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती भुजबळ बंगल्याच्या बाजूस मोकळया मैदानात कर्वेनगर येथे पिस्टल बाळगून थांबला आहे.
त्यांनी सापळा रचून संशयित आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला पाठीमागे १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली.
या आरोपी विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त १, गुन्हे शाखा सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार अमर पवार, नितीन कांबळे, रविंद्र फुलपगारे, प्रविण ढमाळ, संजय भापकर, अमोल आवाड यांनी केली आहे.
