दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : मालकाच्या घरी दीड लाखाची चोरी करुन फरार झालेल्या आरोपीस अवघ्या २ तासात जेरबंद करण्यात यश आले आहे. ही कामगिरी
चंदननगर पोलीसांनी केली आहे.
मोडाराम काकड, (वय २८, रा. हेमपुराखिंवसर, जिल्हा नागोर, राज्य राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून फिर्यादी यांचा चोरी केलेला १,१४,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. दाखल गुन्हयातील आरोपी मोडाराम काकड हा दोनच दिवसापुर्वी त्यांच्याकडे कामाला लागला होता.
फिर्यादी घरी नसल्याची संधी साधुन त्याने त्यांच्या कपाटातील ठेवलेला लॅपटॉप व रोख रक्कम असा एकुण १,४१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पळ काढला होता.या आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवाजी घांडे व शेखर शिंदे यांना माहिती मिळाली की आरोपी मोडाराम काकड हा पुणे रेल्वे स्टेशन येथुन रेल्वेने त्याच्या मुळगावी राजस्थान येथे जाणार आहे.
त्यानुसार तपास पथकातील टीम पुणे रेल्वे स्टेशन येथे रवाना होऊन आरोपीचा शोध घेत असताना, आरोपी हा राजस्थानकडील जाणा-या धावत्या रेल्वे मध्ये चढताना त्याला ताब्यात घेतले.
त्याने गुन्हा कबूल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४ विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील, चंदननगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णु गोने, महेश नाणेकर, सचिन रणदिवे , गणेश हांडगर, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाणे यांनी केली आहे.