सिंहगड रोड पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : घरगुती गॅस सिलेंडर मधुन अवैधरित्या लहान सिंलेडर टाक्यामध्ये गॅस भरणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी सिंहगड रोड पोलिसांनी केली आहे.
आशिष मोरे (वय २७ वर्षे रा. धायरी) व अमर शेडोळे (वय-२५ वर्षे रा. गणेशनगर धायरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याजवळ लहान व मोठे २८ गॅस सिलेंडर , एक वजन काटा, नॉब, रेग्युलेटर असलेला गॅस पाईप, पाना, दोन स्क्रू डायव्हर, असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे तपास पथक कार्यालयात सचिन निकम, संतोष भांडवलकर, व स्टाफ असे हजर होते. तेंव्हा पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना माहिती मिळाली की गारवा बिर्याणी दुकानाच्या समोर धायरी येथील एका रुम मध्ये काही व्यक्ती अनाधिकृतपणे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता सिंलबंद गॅस सिलेडर मधुन लोखंडी रिफिल पाईपच्या सहाय्याने रिकाम्या गैस सिलेडर मध्ये गॅस रिफिल करुन पुन्हा सिल बंद करुन त्यांची विक्री करीत आहेत.
ही माहिती वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांनी माहितीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या ठिकाणी दोन व्यक्ती हे त्यांच्या पत्र्याच्या रुम मध्ये घरगुती सिलबंद गॅस सिलेडर मधुन नॉबच्या सहाय्याने दुसऱ्या रिकाम्या लहान गॅस सिलेडर मध्ये रिफिल करीत असताना दिसून आले.
या ठिकाणी अचानकपणे छापा मारला असता या ठिकाणी दोन व्यक्ती मिळुन आल्या. त्यांनी घरगुती गॅस हा नॉबच्या सहाय्याने त्यांच्याकडील लहान टाक्यामध्ये रिफिल करुन तो बाजारात अवैधपणे विक्री करीत असल्याचे कबूल केले. आरोपी यांच्याविरुध्द सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग अतिरिक्त पदभार सिंहगड रोड विभाग भिमराव टिळे, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, यांच्या पथकाने केली.