जीतोचा १८ वा वर्धापन दिन, सेवा गौरव सोहळा २ एप्रिलला
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) पुणे विभागाच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार प्रमिला नौपतलाल सांकला यांना जाहीर झाला आहे. स्वामी श्री गोविंद देव गिरीजी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा सायंकाळी ५:३० वाजता बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) पुणे विभागाचा १८ वा वर्धापन दिन मंगळवार, दि.२ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अशी माहिती जितो पूणेचे मुख्य सचिव चेतन भंडारी, दिनेश ओसवाल, संजय डागा, किशोर ओसवाल, दिलीप जैन व वर्धापन दिन सोहळा समितीचे अध्यक्ष ॲड. विशाल शिंगवी यांनी दिली.
या सोबतच औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजय उदयबाबू शहा, सामाजिक सेवेसाठी विनोद शंकरलाल राठोड, व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजित सोहनलाल जैन, युवा उद्योजक सुधेंदू चैतन्य शहा, डॉ. पूजा अभिजित लोढा तसेच संस्थात्मक कार्यासाठी आणि माहिती क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रुतभवन श्रुतदीप रिसर्च फौंडेशन यांचा गौरव केला जाणार आहे.
अयोध्येतील श्री रामजन्म भूमी तीर्थक्षेत्राचे विश्वस्त, खजिनदार स्वामी गोविंद देव गिरीजी यांची कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. पूनावाला फिनकॉर्पचे कार्यकारी संचालक अभय भुतडा, पिनन्स कमर्शिअल्सचे संचालक सौरभ बोरा यांची उपस्थिती असणार आहे.
जीतो पुणेचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, जितो अँपेक्सचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, श्रमण आरोग्यम्चे उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो ॲडव्हायझरीचे ॲड. एस. के. जैन, विजयकांत कोठारी, रविंद्र सांकला, जेएटीएफ अँपेक्सचे उपाध्यक्ष इंदर जैन, अँपेक्सचे संचालक अचल जैन, धीरज छाजेड, जीतो महिला विभाग अध्यक्ष संगीता ललवाणी, जीतो क्रीडा विभागाचे अध्यक्ष विशाल जोरडिया, जीतो जे पॉईंट अँपेक्सचे अध्यक्ष अजय मेहता, जीतो आर. ओ. एम. झोनचे अध्यक्ष अजित सेठिया, जेएटीएफ जितो आर. ओ. एम. झोन अध्यक्ष इंदरकुमार छाजेड यांची उपस्थिती असणार आहे.
