माजी मंत्री दिलीप सोपल यांची उपस्थिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : वाहिदपाशा शेख मित्र मंडळ यांच्या वतीने मदिना मस्जिद चौक येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, किरण देशमुख, वसीम पठाण, अॅड. प्रशांत शेटे, शिवाजी जगदाळे, उस्मानाली शहा, मनीष चौहान, इकबाल पटेल, नाना वाणी व शंकर देवकर यांच्यासह शहरातील बहुसंख्य नागरिक व्यापारी राजकीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबेद अली सय्यद, राजू सय्यद, अरिफ महादेवी, पाशाभाई शेख, हैदर शेख, कृष्ण उपळकर, बाळासाहेब क्षिरसागर, नरेंद्र नलावडे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सोपल यांनी तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना भगिनींना ईदच्या निमित्त शुभेच्छा दिल्या.
