महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांनी एल. एल. बी. अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्ण पदक पटकाविले आहे.
सुनिल रामानंद हे १९९४ बॅचचे भारतीय पोलीस सेवा महाराष्ट्र केडरचे पोलीस अधिकारी असुन त्यांनी आतापर्यत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध ठिकाणी विविध पदावर कर्तव्य बजाविले आहे. त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सहपोलीस आयुक्त म्हणुन कामही केलेले आहे.
त्यांना पोलीस खात्यातील उत्कृष्ट सेवेसाठी सन २०१० मध्ये पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व सन २०१२ मध्ये भारत सरकारचे राष्ट्रपती पदक मिळाले आहे. सध्या ते अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण महिती तंत्रज्ञान, व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे येथे सन २०२१ पासुन कार्यरत आहेत.
या कालावधीमध्ये त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे एल. एल. बी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन त्याची मे २०२३ मध्ये अंतिम परिक्षा देऊन त्यात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत व त्यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. व सध्या ते विश्वकर्मा विद्यापीठ येथे एल.एल.एम.चे पुढील शिक्षण घेत आहेत.