अंगावर मात्र मारहाणीच्या खुणा, खडक पोलिसांच्या तपासाला वेग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवार पेठेत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतु, या तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याने या आत्महत्येविषयीही तर्क वितर्क लढवले जात आहेत.
खडक पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शिवांश श्याम पठाडे (वय 7, गार्डन सिटी, वारजे) असे त्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पठाडे कुटुंब मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आहे.
शिवांशचे आई- वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. आदित्य गार्डन सिटी या सोसायटीत लहान मुलांसाठी जलतरण तलाव आहे. शिवांशला त्याच्या आई-वडिलांनी पाण्यात उतरवले. त्यानंतर शिवांशचे आई-वडील सोसायटीच्या परिसरात फेरफटका मारत होते. पंधरा मिनिटांनी पठाडे दाम्पत्य जलतरण तलावाजवळ आले. तेव्हा शिवांश तलावात दिसला नाही.
त्याचा शोध घेतला असता तो पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या ठिकाणी घटनेच्या वेळेस त्या तलावावर जीवरक्षक उपस्थित नसल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे या झालेल्या घटनेबद्दल सोसायटीच्या समितीचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेनंतर वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे नीळकंठ जगताप यांनी घटनास्थळी यांनी भेट दिली. ते पुढील तपास करीत आहेत.