नॅशनल फेडरेशन रोलर म्युझिकल चेअर चॅम्पियनशीप स्पर्धेत यश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : द म्युझिकल चेअर अँड स्केटिंग स्पोर्ट्स असोसिएशन गुजरात द्वारा आयोजित नॅशनल फेडरेशन रोलर म्युझिकल चेअर चॅम्पियनशिप – २०२४ मध्ये बार्शीतील मुलांनी मोठे यश संपादन केले. या स्पर्धेत मुलांनी सुवर्ण पदकासह पदकांची लयलूट केली.
या स्पर्धा अहमदाबाद येथे पार पडल्या. स्केटिंगसह संगीत खुर्ची, स्केटिंगशिवाय संगीत खुर्ची व स्केटिंगसह फ्री स्टाईल या तीन प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रियंका येडलवार यांच्या श्रीशा स्केटिंग क्लब बार्शी मार्फत मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत वेद सिंदोल याने १सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकाविले. तसेच वेदांत बर्डे याने १ सुवर्ण, २ रौप्य, अर्णव कुलकर्णी याने २ सुवर्ण १ रौप्य, सर्वेश उदबाळे याने १ सुवर्ण २ रौप्य, अथर्व केसकर याने २ रौप्य १ कांस्य, रामराजे बारंगुळे याने १ सुवर्ण, १ रौप्य, आणि १कांस्य, सोहम सावंत याने ३ सुवर्ण, कार्तिकेय पवार याने ३ सुवर्ण, अर्जुन भुसारी याने २ सुवर्ण, प्रसाद मांडे याने २ रोप्य, १ कांस्य श्रीशा येडलवार ने २ सुवर्ण,१ रौप्य, हर्ष बेनारे याने १ सुवर्ण १ रौप्य आणि १ कांस्य, कृष्णा ढाळे याने २ सुवर्ण,१ रौप्य,तर दिग्विजय धाकपाडे याने २ सुवर्ण,१ रौप्य पदक पटकाविले.
महाराष्ट्राला दुसरी उपविजेता ट्रॉफी
देशभरातून विविध राज्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या पदक व प्राप्त गुणांकांवरून महाराष्ट्र राज्याला द्वितीय विजेतेपद प्राप्त झाले. प्रियंका येडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले.
