चालक वाहकांचा केला सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : भूम ते पंढरपूर नवीन बस भूम आगाराच्या वतीने सुरु करण्यात आली असून या बसचे आरसोली गावामध्ये “टाळ मृदुंगांच्या” गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी चालक एच.आर. नागरगोजे व वाहक महेश शिंदे यांचा आरसोली गावचे माजी सरपंच प्रशांत मुंडेकर व अमोल खराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ही बस भूम येथून सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, परत पंढरपूर येथून दुपारी ३ वाजता भूम कडे आहे त्याच मार्गाने प्रस्थान करेल. वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी.
भूम ते पंढरपूर बस सेवा सुरु झाल्याने या बसमुळे श्री क्षेत्र पंढरपूर येथे “विठोबा रुक्मिणी” च्या दर्शनासाठी भाविकांची गैरसोय टळणार असून वेळही वाचणार आहें. तसेच बार्शी येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही बस फार महत्वाची आहे असे माजी सरपंच प्रशांत मुंडेकर यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच प्रशांत मुंडेकर, अमोल खराडे, सुदाम नागटिळक, उल्हास सातपुते, सुरेश पाटुळे, कल्याण मुंडेकर, संदीप खराडे, रवींद्र गाढे, गुरुराज गिराम, दिपक नागटिळक, कैलास सातपुते, बापू अंधारे, सिद्धेश्वर खराडे, बापू पाटुळे, दादाराव सुरवसे, नामदेव पाटुळे, राजाभाऊ मुंडेकर, अण्णा गोयकर, हरिदास पाटुळे व गावकरी उपस्थित होते.