महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्यातील आनंद बायोडाटा ग्रुप, अरिहंत जैन बायोडाटा, गुगलिया मॅट्रिमोनिअल बायोडाटा यांनी संयुक्तपणे दि. २ जून २०२४ रोजी महावीर प्रतिष्ठान, पुणा येथे प्रथमच सकल जैन वधू वर परिचय सम्मेलन आयोजित केले होते.
मनसुखलाल गुगळे, शिरूर, हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व विशेष सहयोगी होते. त्यांनी जैन समाजातील विवाह समस्या, अवास्तव अपेक्षा, पुण्याचा आग्रह, मुलांचे वाढते वय, योग्य वयात विवाह न झाल्यास व्यक्तीगत स्वास्थ्य आणि कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य यावर होणारे परिणाम विषद केले.
विवाह समस्या सोडविण्यासाठी युवक, युवती आणि पालकांनी अवास्तव अपेक्षा न ठेवता वेळीच विचार करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आयोजकांनी या परिचय सम्मेलन साठी वयाची व शिक्षणाची कोणतिही अट न ठेवल्यामुळे महाराष्ट्र बरोबर चेन्नई, राजस्थान, कर्नाटक, गुजरात राज्यातील २४ ते ४० वयोगटातील शिक्षीत, उच्च शिक्षीत, घटस्फोटीत, विधूर आणि विरांगणा मिळुन २०२ उमेदवार सहभागी झाले.
संम्मेलनाच्या पहिल्या सत्रात प्रत्येक युवक/युवती ने स्टेजवर जाऊन स्वतःचा परिचय करून दिला.”बायोडाटा देखने से नहीं, बल्की दिल से बात करने से बात बनेगी” हे या परिचय संम्मेलनाचे मुख्य सुत्र होते. त्यामुळे दुसऱ्या सत्रात उमेदवारांना युवकांशी/ युवतिशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले.
यातून बरेच विवाह जुळतील असे वाटते. तिन्ही बायोडाटा ग्रुप चे ॲडमिन, झुंबरलाल गुगळे, अशोक कटारिया, कांतिलाल भंडारी, रवी गुगळे, पुजा गुगळे जैन आणि शितल गुगळे यांनी मेहनतीने जैन समाज्याच्या सर्व पंथांचे सर्व समावेशक असे हे वधू वर परिचय सम्मेलन यशस्वी रित्या पार पाडले.