भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बसची वाट पाहत थांबले असताना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ ठाण्याच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.११ जुन रोजी कात्रज चौक येथुन सोलापुर येथे जाण्या करीता फिर्यादी (रा. कात्रज, पुणे) हे बसची वाट पाहत थांबले असताना दोन अनोळखी इसम फिर्यादी यांच्याकडे आले.
व त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन तु कुठे राहतो असे विचारुन तुझ्या खिशातील पैसे काढ असे म्हणुन फिर्यादी यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यास फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन एका इसमाने त्याकडील लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन फिर्यादी यांचे पँटच्या खिशातील १३००/- रुपये असलेले पैशाचे पाकीट जबरदस्तीने काढुन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन, हाताने मारहाण केली व पळून गेले.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर व निलेश ढमढेरे यांना गोपनिय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की हा दाखल गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी १) दिपक राजेंद्र वाघमारे, (वय १९ वर्षे, रा.आंबेडकरनगर, आर. के कॉलनी समोर, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड, कात्रज) व एक विधीसंघर्षीत बालक यांनी केला असुन दोघे गल्ली क्र. ०३, आंबेडकरनगर, आर. के. कॉलनी, कात्रज, पुणे येथे किराणा मालाच्या दुकानाजवळ थांबले आहेत.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आर. के. कॉलनी, कात्रज पुणे येथे जावुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करताना त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी दिपक वाघमारे याला अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे, नामदेव रेणुसे, शैलेश साठे, चेतन गोरे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, अवधतु जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन गाडे, विक्रम सावंत, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.