महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कोंढवा येथील ८१ वर्षाच्या वृद्धाची मनी लॉड्रींगच्या बहाण्याने चौकशी करायची आहे असे सांगून तब्बल ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ते २५ एप्रिल दरम्यान ही घटना घडली आहे.
ऑनलाईन माध्यमाव्दारे अनोळखी मोबाईलधारक यांनी फिर्यादी यांना तुमचे खाते मनी लॉड्रींग करीता वापरले असल्याचे सांगुन त्याची चौकशी करावयाची असल्याचे भासवले. व फिर्यादीच्या बँक खाते वरून वेळोवेळी मोठ्या रकमा ट्रान्स्फर करून घेतल्या.
१२ दिवसात ३६,४०,०००/- रू. ट्रान्सफर करण्यास भाग पाडून फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक झाली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे). मानसिंग पाटील तपास करीत आहेत.

















