महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून दोन गटांत भांडणे झाली. यातून टोळक्याने हत्याराने पाच गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील १३ जणांवर परस्पर विरोधीगुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राणी महादेव कामठे (वय ४५, खैरे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चंदशेखर ऊर्फ पिल्या चोरमले, किरण चव्हाण, आशिष झेंडे, अतिष झेंडे, रोहित पाटील, यश जैन (सर्व रा. लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
रवींद्र साहेबराव झेंडे (वय ४० रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अविनाश कामठे, प्रसाद बेटीथोर, अक्षय पवार, गणेश घोडसे यांच्यासह तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र झेंडे व राणी कामठे यांच्या मुलांची जुनी भांडणे आहेत.
शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आशिष झेंडे व मित्रांनी राणी कामठे यांच्या घरासमोर येऊन लोखंडी हत्याराने वाहनांची तोडफोड केली. ‘तुमचा मुलगा अविनाश कामठेचा आम्हीचमर्डर करणार,’ अशी धमकी देऊन निघून गेले. यानंतर रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास रवींद्र झेंडे यांच्या घरासमोर अविनाश कामठे हा मित्रांसह आला.
घरासमोरील दुचाकीची तोडफोड केली. लोखंडी हत्यार हवेत फिरवून ‘तुमच्या मुलाला मारून टाकतो’ अशी धमकी दिली. पोलीस तपास सुरु आहे. या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार उपनिरीक्षक अमोल घोडके घटनास्थळी धावले. या घटनेत पाच गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

















