महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पार्किंगच्या वादातून चारचाकी गाडीची काच फोडून नुकसान केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला शिवीगाळ करुन धमकी दिल्याची घटना पिसोळी परिसरात बुधवारी घडली आहे.
पिसोळी येथील एका सोसायटीच्या पार्कींगमध्ये असलेल्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 40 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बाबासाहेब देशमुख व आकाश देशमुख (रा. आरव्ही इन्प्रेरिया, पिसोळी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच सोसायटीत राहत आहेत. फिर्यादी यांनी त्यांची अल्टो कार सोसायटीच्या पार्कींगमध्ये लावली होती. आरोपींनी या कारच्या काचा फोडून नुकसान केले. कारची काच फोडल्याबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी महिला गेल्या असता आरोपी आकाश याने त्यांच्या पतीला आरेरावी केली.
त्यावेळी फिर्यादी यांनी पार्कींगच्या जागेची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपी राहुल आणि आकाश यांनी गोंधळ घालून महिलेला शिवीगाळ केली. तसेच फिर्य़ादी यांच्या पतीला तु सोसायटीच्या बाहेर भेट मी तुला दाखवतो अशी धमकी दिली. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
