महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई -पुणे रोडवर खडकी येथे भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याने वृद्धाचा मृत्यु झाला.
याप्रकरणी त्यांचा मुलगा सुरज शिंगोटे याने खडकी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या अपघातात रामभाऊ देवराम शिंगोटे (वय ६६ वर्षे, रा. शिंगोटे चाळ दापोडी पुणे) यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१८ जून रोजी मध्यरात्री हा अपघात झाला होता. अपघातानंतर दुचाकीस्वार थेथे न थांबता पळून गेला. जखमी झालेल्या शिंगोटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
