महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आपण सीबीआय मधून बोलत आहोत असे सांगून एका भामट्याने भारती विद्यापीठ परिसरातील एका महिलेची २० लाख रुपयाची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी एका २८ वर्षीय महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २३ मे ते १४ जून या काळात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी इसमाने आपण कस्टम विभागातील सीबीआय मधून पोलीस बोलत असल्याचे सांगितले.
आपले आधारकार्ड लिंक असलेल्या बँक खात्याची पडताळणी करायची असे सांगुन त्यांचे विविध बँक खात्यावर २०,०९०,५०/- रू. ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र नंतर आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद झिने करीत आहेत.
