महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामी येत आहे. त्यामुळे ३० जून ते ३ जुलै या कालावधीत ड्रोन व्दारे शहर परिसरात पालखी सोहळ्याचे छायाचित्रण करण्यास पुणे पोलिस आयुक्तांनी बंदी घातली आहे.
पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये.यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश जारी केल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. या आदेशाचे अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशा सूचना सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. कोणी असे करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
पुणे शहरात माऊलींचा पालखी सोहळा दोन दिवसाच्या मुक्कामी येत आहे. त्यामुळे ३० जून ते ३ जुलै या कालावधीत ड्रोनव्दारे शहर परिसरात पालखी सोहळ्याचे छायाचित्रण करण्यास पुणे पोलिस आयुक्तांनी बंदी घातली आहे. पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश जारी केल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पालखी सोहळा रविवारी पुण्यात येत आहे. या निमित्ताने लाखो वारकरी पुण्यात येत असतात. काही लोकाकडून याचा गैर वापर होऊ शकतो. ज्यांना चित्रण करायाचे असेल तर त्यांनी त्याची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे.
