महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली, भावडी तसेच परिसरात दहशत माजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगाराला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
रोहित उर्फ घोड्या सुनील चव्हाण (वय-२१ रा. जाधव वस्ती, भावडी रोड, वाघोली) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित चव्हाण यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगणे, दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, नुकसान करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे लोणीकंद पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ यांच्याकडे पाठवला होता. प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून पुढील दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. हे आदेश २६ जून २०२४ पासून पुढील दोन वर्षाकरिता आहे.

















