महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाच कुटुंबातील तिघांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारात तिघांची तब्बल २९ लाख रुपयांची फसवणूक झालीआहे.. लष्कराची गुप्तचर यंत्रणा (मिलिटरी इंटेलिजन्स) आणि पोलिसांनी कोल्हापुरातील एकाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार याबाबत साताप्पा रामचंद्र वागरे (वय ४६, रा. करंजफेल शिरोली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप गुरव (३९, रा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटेनगर, जि. कोल्हापूर) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार १ जून २०२० ते १२ जुलै २०२१ या कालावधीत मिलिटरी हॉस्पिटल, खडकी येथे घडला आहे.लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संदीप गुरव याची साथीदार अश्विनी पाटील हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी साताप्पा वागरे हेकोल्हापूर येथील राधानगरी एस आगारात वाहक (कंटक्टर) म्हण् काम करतात. २०२० मध्ये एक मित्रामार्फत त्यांची संदीप गुरव याच्यासोबत ओळख झाली होती.
संदीप याने तिघांचे नोकरीचे काम होईल, असे सांगितले. प्रत्येकी बारा लाख रुपये या प्रमाने मला ३६ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यांनी पैसेही दिले यानंतर आरोपीने बनावट नियुक्तीपत्र दिले.
फिर्यादी यांच्यासह तिघेही नोकरीच्या ठिकाणी रुजु होण्यासाठी आले असता मिलिटरी हॉस्पिटलच्या गेटवर त्यानी दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. फिर्यादी याना संदीप गुरव याने पैसे घेऊन नियुक्तीचे बनावट देऊन फसवणूक केल्याचे लक्ष्यात आले. त्यानंतर त्यानी पोलिसात तक्रार दिली आहे. तपास पो. उप. निरीक्षक. मालोजी कांबळे करीत आहेत.
