महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सोन्याचे दागिने स्वस्तात बनवून देण्याचे आमिष डकवून वडगाव शेरीतील एकाची ३२ लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंढवा रोड रिलायन्स मार्ट वडगाव शेरी येथिल फिर्यादी यांना एका महिलेसह दोघांनीसोन्याचे दागिने स्वस्तामध्ये बनवुन देण्याच्या बहाण्याने घेतलेली रक्कम परत न करता, तसेच सोन्याचे दागिने बनवुन न देता त्यांची एकुण ३२,२५,०००/- ची आर्थिक फसवणुक केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. मुंढवा रोड रिलायन्स मार्ट वडगाव शेरी येथे राहण्याऱ्या फिर्यादी यांना वर नमुद इसमांनी सोन्याचे दागिने स्वस्तामध्ये बनवुन देण्याच्या बहाणाने फिर्यादी व इतर दोन साक्षीदार यांचेकडुन घेतलेली रक्कम परत न करता, तसेच सोन्याचे दागिने बनवुन न देता त्यांची एकुण ३२,२५,०००/- रु.ची आर्थिक फसवणुक केली.
हा तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. शेख करीत आहेत.















