महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तीच्या सततच्या मानसिक छळास व मारहाणीस कंटाळून एका ३० वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी येथे घडली आहे.
सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी शिवानी दिपक दामगुडे, (वय २४ वर्षे, रा. सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी) हिस तिचा पती चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी पट्टयाने मारहाण व शिवीगाळ करुन सोडुन देण्याची धमकी देऊन देत होता.
त्याच्या या छळामुळे तिने २ जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलसांनी तिचा पती दिपक विठ्ठल दामगुडे, (वय ३० रा. सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी) यास आत्म्हत्यास प्रवृत्त केल्या बददल अटक केली आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक सी.बी.बेरड करीत आहेत.















