महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सासरी होणाऱ्या छळामुळे हडपसरच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील सुनिल शिवपुजे, (वय ५३, रा. मु.पो. पाटस, ता. दौड, जि.पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी शिवानी सिध्दार्थ थोरात (वय २६ वर्षे, रा. शिवराय कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे) सासरी नांदत असताना पती, व इतर नातेवाईक यांनी आप-आपसात संगनमत करून, तीस टोचुन बोलुन, तीचा शारिरीक व मानसिक छळ करून तीचे राहते घरी गळफास घेवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. असे फिर्यादीत म्हटले आहे.















