गुन्हे शाखेची कारवाई : जिवंत काडतुसेही जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दिवसा ढवळ्या देशी कट्टे, पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. सिंहगड रस्त्यावर वडगाव ब्रिज जवळ ही कारवाई करण्यात आली.
खंडणी विरोधी गुन्हे शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या देखरेखीखाली माहिती काढत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व पवन भोसले यांना काही जन देशी कट्टे घेऊन वडगाव ब्रिज जवळ उभे असल्याची गुप्त माहिती मिळाली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने धाव घेतली. अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संकेत गांडले (वय २१ वर्षे, रा. नांदेड फाटा, पुणे), मंगेश भोसले (वय २१ वर्षे, रा. कोल्हेवाडी सिंहगड रोड फाटा, पुणे) यांना मधुकोष सोसायटी समोरुन प्रायेजा सिटी कडे जाण्याऱ्या कॅनॉल रोडला वडगाव खुर्द पुणे परिसरामध्ये सापळा रचून पकडले.
त्याच्याकडून देशी बनावटीचे एकूण ०४ पिस्टल व ०७ जिवंत काडतूसे असा किं. १,०३,५४०/- चा माल जप्त केला आहे. त्यांच्याविरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, आजिनाथ येडे, पवन भोसले, संग्राम शिनगारे, विजय गुरव, सैदोबा भोजराव, गणेश खरात, चेतन आपटे, राहुल उत्तरकर, चेतन शिरोळकर, चेतन चव्हाण यांनी केलेली आहे.

















