मुख्य विंगमध्ये शिक्षण, तर युवा विंगमध्ये सेवा श्रेणीमध्ये सन्मान
पुणे : जीतोच्या ROM झोनमध्ये चिंचवड-पिंपरी चॅप्टरला एक नव्हे, तर तब्बल दोन गोल्डन अवॉर्ड मिळाले आहेत. जीतोच्या ROM झोनमध्ये मुख्य आणि युवा अशा दोन विंगमध्ये दोन गोल्डन अवॉर्ड मिळाले असून, यानिमित्त सदस्यांचे, स्वयंसेवकांचे आणि समर्थकांचे कोतुक होत आहे.
मुख्य विंगमध्ये आपल्या सदस्यांसाठी अनेक औद्योगिक भेटी आयोजित करण्यासह शिक्षण विषयामधील अपवादात्मक प्रयत्नांसाठी जीतो प्रमुख स्तंभ (आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, सेवा) श्रेणीत पुरस्कृत करण्यात आले असून, युवा विंगमध्ये त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी आणि समुदाय सेवेतील समर्पणासाठी सेवा या श्रेणीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला आहे.
यानिमित्त जितो पिंपरी चिंचवड चॅप्टरचे चेअरमन मनीष ओसवाल, चीफ सेक्रेटरी योगेश बाफना, सेक्रेटरी दीपेश बाफना, लेडीज विंग चेअरमन वैशाली बाफना, चिप्स सेक्रेटरी योगिता लुंकड, युथ विंग चेअरमन सौरभ बेदमुथा, चिप्स सेक्रेटरी प्रणव खाबिया यांच्या सर्व सदस्यांचे वरिष्ठांकडून अभिनंदन केले जात आहे.















