महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम येथील समर्थ नगर भागात राहणारे अनिल, सुनील व हरिभाऊ दत्तोपंत महामुनी यांच्या आई इंदुबाई दत्तोपंत महामुनी यांचे ०८ जुलै २०२४ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
महामुनी बंधूच्या मुलांनी आपल्या आजीच्या स्मृती जाग्या राहाव्यात यासाठी भूम ग्रीन चळवळी माध्यमातुन आज रक्षा विसर्जन करून आलमप्रभु देवस्थानच्या परिसरात आंब्याचे झाडाचे रोपण करण्यात आले.
या प्रसंगी भुम ग्रीन चळवळ चे प्रवर्तक फैजान काझी व महामुनी कुटुंबातील अथर्व महामुनी, शार्दुल महामुनी, प्रज्ञेश महामुनी, शरयु महामुनी, स्वानंदी महामुनी यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस व मृत्यू पावलेल्या आपल्या प्रियजनाच्या आठवणी कायम जपून ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करून पर्यावरण रक्षण करावे असे आवाहन ग्रीन भूम चे प्रदीप गायकवाड, दीपक बारबोले शैलेश फलके यांनी केले आहे.
