महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बंडगार्डन परिसरातील अतिक्रमण हटवताना कारवाईसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बाचाबाची केल्याची घटना गुरुवारी घडली.
मोहीम सुरु असताना विरोध झाल्यामुळे काही काळ या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत तहसीलदार व कर्मचारी यांच्याशी झटापट करणाऱ्या गोंधळ घालणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आहे.
सी टी एस 17 फायनल प्लॉट नं. २४६ बंडगार्डन मोबोस कंपाऊंड येथे दुपारी ३ वाजता ही घटना घडली आहे. तेथील दुकान, टपऱ्या यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई करण्यात येत होती.
यावेळी जमलेल्या जमावाने तहसीलदार, अधिकारी व कर्मचारी यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.त्यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच जमावाने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण केली.
या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास पोलिस उप निरीक्षक भारती इंगोले करीत आहेत.
