लोणीकाळभोर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कदम वाक वस्ती हद्दीत एका रुग्णालयात रुग्णांना औषध गोळया विकणाऱ्या बोगस डॉक्टरला पकडण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी पांडवदंड रोड येथे जनसेवा क्लिनिक या दवाखान्यामध्ये नेमणुकीस असलेल्या वैदयकिय अधिकारी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा इसम महाराष्ट्र कौंसिल ऑफ मेडीसिन या परिषदेचा नोंदणीकृत व्यवसायिक नसताना देखील डॉक्टर असल्याबाबत कोणतीही पदवी अथवा शैक्षणिक पात्रता नसताना लोकांना डॉक्टर असल्याचे सांगत होता.
व वैदयकिय व्यवसायासाठी लागणारे साहीत्य व औषध गोळया विनापरवाना विक्री करुन लोकांची फसवणुक करीत होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या बोगस डॉक्टर ला ताब्यात घेतले आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
