महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अनोळखी युवकाने ऑनलाईन माध्यमातून पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहाण्याने ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना कोथरूड मध्ये घडली आहे.
या प्रकरणी एका चाळीस वर्षाच्या नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी युवकाने त्यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला व त्यांना पार्ट टाईम जॉब देण्याचे आश्वासन दिले.
वेगवेगळ्या लिंक देऊन टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यातून पैसे गुंतवणूक करून परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्याला भुलून फिर्यादी ने त्यांच्या खात्यात ३२,५३,०६२ रु इतकी रक्कम टप्या टप्प्याने भरली. मात्र परतावा मिळाला नाही.
त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री त्यांना पटली. व त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.हा तपास पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम करीत आहेत.
