महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अनोळखी युवकाने ऑनलाईन माध्यमातून स्टॉक मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी युवकाने फिर्यादीशी मोबाईल वर सम्पर्क साधून त्यांना स्टॉक व ॲपलीकेशनव्दारे आयपीओ मिळवून देतो असे सांगितले. नफ्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले.
त्यांची या प्रकरणातून २७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर क्राइम ॲक्ट नुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून हा तपास पोलीस निरीक्षक विजय कुंभार करीत आहेत.
