महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : चार्तुमास निमित शुक्रवार पेठ येथील श्री गाेडवाड जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ येथे याेगनिष्ठ प. पू. आचार्य श्री विजय केशरसुरीश्वरजी महाराज समुदायच्या प. पू. साध्वीजी विनयप्रभाश्रीजी, महाराष्ट्र दिपीका यशप्रभाश्रीजी, प. पू. अरिहंत प्रभाश्रीजी तथा प. पू. अपूर्वश्रीजी म. सा. यांचा भव्यदिव्य असा प्रवेश झाला. या वेळी गाेडवाड ट्रस्टच्या वतीने सर्वांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यानिमित्त गाेडीजी मंदिरा पासून शाेभायात्रेचे आयाेजन करण्यात आले हाेते. ढाेल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शाेभायात्रेच्या अग्रभागी बँड पथक हाेते. गाेडवाड महिला मंडळ यांसह जैनबांधव माेठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले हाेते.
या वेळी गाेडवाड महिला मंडळाच्या वतीने स्वागत गीत सादर करण्यात आले. संगीतकार अभय व आशिष शहा यांनी भक्ती गीत सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढविली. प. पू. आचार्य वैराग्यरत्न सागरजी म. सा. यांचे आर्शिवाद देण्यासाठी गाेडवाड भवन येथे आगमण झाले.
या वेळी गुरुदेव यांनी प्रवचनामध्ये चार्तुमासचे महत्व सांगितले. तसेच, सर्वांनी चार महिने ध्यान, साधना, आराधना करण्याबराेबच प्रवचनचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
गुरुपूजनचा मान अमृतीबेन कुंदलमन विनाकिया परिवाराला मिळाला आहे.
गाेडवाड संघाचे विश्वस्त गणपत मेहता, प्रकाश छाजेड, संपत जैन, भद्रेश बाफना, तेजपाल बाफना, सुरेश कुंकूलाेळ, राेहित बाफना, पारस बाेराना, अशाेक लाेढा, कमलेश नहार, किरण बलदाेटा, गाेडवाड महिला मंडळाच्या अध्यक्षा वासंतीबेन वाेरा आणि चंचलबेन लाेढा यांसह अन्य मान्यवर माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
चार्तुमासनिमित्त दरराेज प्रवचन, आराधना आदी कार्यक्रमांसह दर रविवारी बाल संस्कार शिबिर आणि महिलांसाठी शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे, अशी माहिती विश्वस्त संपत जैन यांनी दिली.















